मराठी भाषा दिनानिमित्त राज्यस्तरीय कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा

State level calligraphy word-picture drawing competition on the occasion of Marathi language day

मराठी भाषा दिनानिमित्त राज्यस्तरीय कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा

 

कुसुमाग्रज जन्मदिन तथा मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल ट्रस्टच्याच्या वतीने 'मराठी विचारधारा प्रतिष्ठान' पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती मराठी सुविचार आणि म्हणी या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Read More महिला बीजेपी कार्यकर्ता के साथ छेड़छाड़ के आरोपों के बाद कांग्रेस कार्यकर्ताओं पर मामला दर्ज


विद्यार्थी, कलाशिक्षक, चित्रकार, हौशी चित्रकार या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. पहिल्या पाच क्रमांकाना सन्मानचिन्हासह रोख पारितोषिक तर इतरांना सहभाग प्रमाणपत्र २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या
मराठी भाषा दिवस कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे ९८२१५७४८९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, ऍड देवदत्त लाड यांनी केले आहे. 

Read More ठाणे पुलिस की एंटी एक्सटॉर्शन सेल ने हथियारबंद डकैती में शामिल एक गिरोह को गिरफ्तार किया

Tags:
Sabri Human Welfare Foundation Ngo

Latest News